IPL 2026 : क्वालिफायर-2 मध्ये टॉसवेळी गोंधळ, पुन्हा झाला टॉस, शुभमन गिल नाराज...

RR VS GT : आयपीएल २०२६ मध्ये आज क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीपूर्वी टॉसवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुल्लांपूरच्या Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium येथे ही घटना घडली. गुजरातचा कर्णधार शुभमन गील याने नाणं उडवलं, तर राजस्थानचा कर्णधार रियान परागयाने हेड अशी कॉल दिली. मात्र नाणं खाली पडल्यानंतर मॅच रेफरी प्रकाश भट्ट यांना कॉल स्पष्ट ऐकू न आल्याने काही काळ गडबड निर्माण झाली.यानंतर समालोचक रवि शास्त्री यांनी री-स्पिन ची घोषणा केली आणि पुन्हा टॉस घेण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात रियान परागने पटकन हेड कॉल दिला आणि नाणंही हेडवर आलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.





टॉसनंतर रियान पराग म्हणाला, खेळपट्टी सुरुवातीला चांगली आहे, पण पुढे संथ होऊ शकते. आमच्याकडे त्यासाठी योग्य गोलंदाज आहेत.दरम्यान, शुभमन गिल टॉसनंतर नाराज दिसला. तोही प्रथम फलंदाजी करू इच्छित होता. त्याने लगेच मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याच्याशी चर्चा केली. गिल म्हणाला, आम्हीही आधी फलंदाजीच केली असती. आता आमच्यासाठी करो या मरो ची परिस्थिती आहे.


राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11


यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासुन शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, बृजेश शर्मा, यश राज पुंजा.


गुजरात टायटन्स प्लेइंग-11


साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशिद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment

Nashik News : राष्ट्रकुलमध्ये नाशिकच्या सुपुत्राची सुवर्ण झेप; लेकाने 'गोल्ड' जिंकल्याची बातमी शिक्षकांच्या फोनवरून कळली, शाळेत पालकांचा सत्कार

Nashik News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलेटिक्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान

CWG 2026 : नीरजसह तीन भारतीय भालाफेकपटू अंतिम फेरीत

ग्लासगो : दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमधील पुरुषांच्या भालाफेक

England Coach Change : ईसीबीचा मोठा निर्णय! ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदी नियुक्ती

मुंबई : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवार, ३० जुलै रोजी कसोटी संघाच्या व्यवस्थापनात मोठे बदल केले

Commonwealth Games 2026 : नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम यांच्यात होणार रोमहर्षक महामुकाबला; जाणून घ्या थेट प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती

जागतिक स्तरावर भालाफेक (Javelin Throw) क्षेत्रातील दोन सर्वात मोठी आणि लोकप्रिय नावे पुन्हा एकदा आमनेसामने येण्यासाठी

Ajinkya Rahane : जे अनेक दिग्गजांना जमले नाही, ते अजिंक्यने करून दाखवले; अजिंक्यच्या कर्णधारपदाची अविस्मरणीय कामगिरी

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेचा पर्व आता संपुष्टात आले आहे. अजिंक्य राहणेने ३८ व्या वर्षी

Ajinkya Rahane Retire : "तुम्ही मला परकं मानलं नाही..."; निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणेचा कंठ दाटला, भावुक व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत शांत, संयमी आणि कठीण काळात संघाचा 'संकटमोचक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी