Shreyas Iyar Sister Controversy : श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप; अश्लील मेसेज करत सर्व मर्यादा ओलांडल्या; नेमकं प्रकरण काय ?

पंजाब किंग्स आयपीएल 2026 मधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. अखेर या संपूर्ण वादावर श्रेष्ठाने मौन सोडल आहे. श्रेष्ठाने सोशल मिडीयवर प्रतिक्रिया देत ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला आहे. श्रेष्ठा अय्यरने सांगितले की, तिने बनवलेला व्हिडीओ हा केवळ मजेशीर होता, कोणत्याही संघाचा किंवा खेळाडूचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. मी फक्त माझ्या भावाच्या संघाला पाठिंबा देत होते. याचा अर्थ असा नाही की मी इतर संघांशी ईर्ष्या करते, असे ती म्हणाली.


मात्र या व्हिडीओनंतर काही लोकांनी तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर तिच्या कामाच्या ठिकाणी फोन करूनही अपमानास्पद भाषा वापरण्यात आली असा दावा तिने केला. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि काही लोकांनी त्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. असे म्हणत श्रेष्ठाने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.





नेमकं प्रकरण काय ?


हा वाद केकेआर विरुद्ध पंजाब सामन्यानंतर सुरू झाला होता. सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर श्रेष्ठाने पंजाबी लोकांचे मन मोठे असते, हा तुझ्यासाठी एक गुण, असा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र चाहत्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत तिला लक्ष्य केले. नंतर वाढत्या ट्रोलिंगमुळे श्रेष्ठाने तो व्हिडीओ डिलीट केला. यामुळे श्रेयस अय्यरची बहिण सध्या चर्चेत आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव