Shocking : खेळाच्या वादातून कबड्डीपट्टूची हत्या; भररस्त्यात गोळ्या झाडल्या, ९ आरोपींना अटक

Rajasthan Crime News : राजस्थानमधून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील हनुमानगड जिल्ह्यात कबड्डीच्या खेळातून सुरू झालेला वाद थेट जीव घेण्यापर्यंत पोहोचला. भद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलाना गावात १७ वर्षीय कबड्डीपटू संदीप कुमार याच्यावर काही खेळांडूनी गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने सर्व आरोपींना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र मुख्य आरोपी विशाल धनक आणि त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत संदीप आणि मुख्य आरोपी विशाल धनक हे दोघेही कबड्डीचे खेळाडू होते. काही दिवसांपूर्वी खेळादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जुन्या रागातून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी संदीपवर हल्ला केल्याचा आरोप आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी दुपारी ४ वाजता कलाना गावातील श्री श्याम मोबाईल दुकानावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सील करून एफएसएल आणि एमओबी पथकांच्या मदतीने पुरावे गोळा केले आणि सखोल तपास सुरू केला.


गोळीबारात २२ वर्षीय मनीष सिंग गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर मुख्य आरोपी विशाल धनकने हनुमंगरिया नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. राजस्थानसह हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात छापेमारी करत पोलिसांनी प्रदीप, उत्तम, संजय, सुभाष, लालकृष्ण, रमजान, अनिल, सुरेंद्र आणि खेतराम या ९ आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची