मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून आजपासून प्लेऑफच्या थराराला सुरुवात होत आहे. लीग स्टेजमधील दमदार कामगिरीनंतर चार संघांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. यामध्ये आरसीबी (Royal Challengers Bengaluru), गुजरात (Gujarat Titans), हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान (Rajasthan Royals) या संघांचा समावेश आहे. (IPL 2026 Playoffs)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : एक संतुलित संघ पण...
या चारही संघांमध्ये किंग कोहलीचा आरसीबी हा संघ सर्व बाजूने संतुलित वाटत आहे. Royal Challengers Bengaluru यंदा सर्वात संतुलित संघ म्हणून समोर आला आहे. फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिससारखे अनुभवी खेळाडू तर गोलंदाजीत डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करणारे बॉलर्स हे RCB चे मोठे बलस्थान ठरले आहे. (IPL 2026 Playoffs)
बर्लिन (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या जर्मनीसमोर आता पुन्हा एकदा जगज्जेतेपद पटकावण्याचे मोठे आव्हान ...
गुजरात टायटन्स : शांत पण धोकादायक
गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा शांतपणे प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. या वर्षी या संघाची गोलंदाजी आणि संकटात सामना फिरवण्याची क्षमता ही सर्वात लक्षणीय ठरली आहे. तसेच मजबूत बॉलिंग अटॅक, फिनिशर्सची ताकद आणि कर्णधाराची शांत रणनीती ही संघाची जमेची बाजू आहे तर दुसरीकडे टॉप ऑर्डर लवकर कोसळल्यास अडचण, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दबाव या गोष्टींमुळे हा संघ अडचणीत येऊ शकतो. (IPL 2026 Playoffs)
कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२६ मधील ७० व्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रणकंदन पाहायला मिळला. दिल्ली ...
सनरायझर्स हैदराबाद : सर्वात आक्रमक संघ
राजस्थान रॉयल्स : युवा जोश आणि स्पिनची ताकद
राजस्थानच्या युवा खेळाडूंनी यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. उत्कृष्ट स्पिन अटॅक, युवा खेळाडूंची आक्रमकता आणि मोठे सामने जिंकण्याची क्षमता ही या संघाची जमेची बाजू आहे तर, फलंदाजीत सातत्याचा अभाव, डेथ ओव्हर्समध्ये रन रोखण्यात अडचण येणे यामुळे या संघाची विजयाची स्वप्न काहीशी धूसर ठरू शकतात. (IPL 2026 Playoffs)
LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
गुजरात की आरसीबी; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट ?
प्लेऑफचे सामने कधी?
Qualifier 1 : आरसीबी vs गुजरात टायटन्स - मंगळवार २६ मे Eliminator : सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स - बुधवार २७ मे Qualifier 2 : २९ मे Final : ३१ मे, अहमदाबाद




