Monday, May 25, 2026

Nashik TCS Case : निदा खान प्रकरणी मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

Nashik TCS Case : निदा खान प्रकरणी मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहे. याच प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिक TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आज अखेर नाशिक पोलिसांसमोर हजर झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात मतीन पटेल दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी जोडल्याचं दिसून आलं. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान अनेक दिवसांपासून फरार होती. पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे मात्र अनेक दिवस ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यत पोहोचल्याचे समोर आले. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे.

निदा खानला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्याने, आज सोमवारी ( २५ मे) पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर हजर झाला आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मतीन पटेल याच्याविरुद्ध आरोपीला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईअंतर्गत पटेलला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नाशिक रोड न्यायालयात मतीन पटेल, निदा खान आणि इतर चार संशयितांविरुद्ध सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने पटेलला थेट नोटीस बजावली, ज्यामुळे त्याने नरमाईची भूमिका घेत पोलिसांसमोर हजर होण्याची तयारी दर्शवली आणि आज तो पोलिसांसमोर हजर झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >