प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून वेळीच गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
गणेश शिंदे यांची पोस्ट...
सध्याच्या डिजिटल युगात बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ पडद्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारे हे स्टार्स आता लाँग व्हिडिओ आणि ...
'कानावरून गेलं…“मोगरा फुलला” कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्यानं मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्समुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीनं मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले.'
मुंबई : Meta, LinkedIn, Oracle यांच्यानंतर आता Cisco Systems नेही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाकडे वेगाने ...
'प्रतिक्षाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित होईल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबारायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटलं तू आता बरी होशील आणि माऊलीसमोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी…या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवतं, अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचं.'





