Sansad Ratna 2026 : ‘संसदरत्न २०२६’मध्ये महाराष्ट्राचा दबदबा

नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खासदारांसह ४ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार २०२६’साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ५ खासदारांचा समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संसदीय कामगिरीच्या आधारे यंदा १० लोकसभा खासदार आणि २ राज्यसभा खासदारांची निवड करण्यात आली आहे.






महाराष्ट्रातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, भाजपच्या डॉ. मेधा कुलकर्णी, स्मिता वाघ, हेमंत सावरा यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य खासदारांमध्ये जगदंबिका पाल, पी. पी. चौधरी, निशिकांत दुबे, प्रवीण पटेल, विद्युत महतो, लुबाराम चौधरी, नरहरी अमीन यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. संसद सदस्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ पर्यंतच्या संसदीय कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आल्याचे प्रियदर्शनी राहुल यांनी स्पष्ट केले.



चार संसदीय समित्यांनाही गौरव


यंदा उत्कृष्ट कामगिरीबद्दल ४ संसदीय स्थायी समित्यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती तसेच अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा आणि खाण समितीचा समावेश आहे.


जुलै २०२६ मध्ये नवी दिल्लीत होणार सोहळा


संसदरत्न पुरस्काराची स्थापना २०१० मध्ये चेन्नईस्थित ‘प्राइम पॉइंट फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार केली होती. २०१० मध्ये झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ. कलाम यांनी केले होते. मागील १५ पुरस्कार सोहळ्यांमध्ये खासदार आणि समित्यांना एकूण १४३ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. १६ वा संसदरत्न पुरस्कार सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे.

Comments
Add Comment

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे