Mumbai : आयपीएल २०२६ मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडताना दिसून येच आहे. २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलागही आता संघासाठी छोटी गोष्ट झाली आहे. फलंदाजांच्या वाढत्या वर्चस्वामुळे स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि Commentator आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी काही धक्कादायक नियम बदल सुचवले आहेत. त्यातील १०० मीटरपेक्षा मोठ्या षटकाराला ८ धावा देण्याचा प्रस्ताव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.आकाश चोप्राच्या मते, हे नियम लागू झाले तर आयपीएलचा थरार आणखी वाढेल आणि गोलंदाजांनाही काही प्रमाणात फायदा होईल. आकाश चोप्रांनी तीन खास नियम सुचवले आहेत.
३ विकेट्स घेतल्या तर टाकता येणार ५ वी ओव्हर?
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त ४ ओव्हर्स टाकण्याची परवानगी आहे. मात्र आकाश चोप्राने सुचवलं आहे की, जर एखाद्या गोलंदाजाने आपल्या ४ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स घेतल्या तर त्याला अजून एक ओव्हर टाकण्याची संधी मिळावी. अस झाले तर सामन्यात गोलंदाजांचं महत्त्व वाढेल, असं त्याचं मत आहे आणि फलंदाजांवर अधिक दबाव निर्माण करता येईल.
मोठ्या विजयासाठी जास्त गुण देण्याची मागणी
दुसरा प्रस्ताव गुणतालिकेशी संबंधित आहे. चोप्राच्या मते, फक्त विजय नव्हे तर किती मोठ्या फरकाने विजय मिळाला हेही महत्त्वाचं ठरलं पाहिजे. जर एखाद्या संघाने १५-१६ ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठलं किंवा ४० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला, तर त्या संघाला २ ऐवजी ३ गुण द्यायला हवेत. त्यामुळे संघ मोठ्या विजयासाठी अधिक आक्रमक खेळ करतील आणि सामना आणखीन रोमांचक होईल.
१०० मीटरचा षटकारला ८ धावा
सर्वात चर्चेत आलेला प्रस्ताव म्हणजे लांब षटकारासाठी अतिरिक्त धावा दिली पाहिजेत. आकाश चोप्राने सुचवलं आहे की, जर फलंदाजाने १०० मीटरपेक्षा मोठा षटकार मारला तर त्याला थेट ८ धावा मिळाव्यात. याआधीही रोहित शर्मा (Rohit Sharma) यानी ही अशाच प्रकारची कल्पना मांडली होती. मात्र हा नियम वादग्रस्त ठरू शकतो, असं आकाश चोप्रानी स्वता मान्य केले आहे. या प्रस्तावांवर अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये या नियमांची जोरदार चर्चा रंगली आहे.