World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसनराव नजन पाटील यांनी आता शेतीत एक अनोखा आणि चर्चेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील शेतात जपानमधील अत्यंत महागडा आणि दुर्मिळ समजला जाणारा ‘मियाझाकी’ आंबा लावला असून यंदा प्रथमच या झाडांना फळधारणा झाली आहे. (World's Most Expensive Mango)


पोलीस दलात कार्यरत असताना धाडसी कारवाया आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले किसनराव पाटील हे सुमारे दीड वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आधुनिक आणि प्रयोगशील शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतात विविध जातींच्या कलमी आंब्यांची लागवड करत असतानाच त्यांनी एक पाऊल पुढे टाकत थेट दक्षिण भारतातून जपानच्या प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंब्याची तीन रोपे आणून लावली. (World's Most Expensive Mango)



काळजीपूर्वक निगा, हवामानानुसार व्यवस्थापन आणि योग्य खतपाण्यामुळे यंदा प्रथमच या झाडांना मोहोर आला आहे. सध्या तीन झाडांवर तब्बल २२ आंबे लागले असून पुढील काही दिवसांत हे आंबे पूर्णपणे परिपक्व होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मियाझाकी आंब्याची लागवड फारच कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. (World's Most Expensive Mango)


मियाझाकी आंबा हा मूळ जपानमधील अत्यंत प्रीमियम वाण मानला जातो. त्याचा रंग लालसर-जांभळा असून आकर्षक चमक ही त्याची खासियत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा ‘एग ऑफ सन’ या नावाने ओळखला जातो. गोडवा, सुगंध आणि पोषणमूल्यांमुळे या आंब्याला मोठी मागणी आहे. (World's Most Expensive Mango)



या आंब्याची किंमत ऐकून सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. बाजारात मियाझाकी आंब्याचा दर साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचतो. देशातील काही मोजक्या शेतकऱ्यांनीच या आंब्याची लागवड केली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर परिसरातील एका शेतकऱ्याने तर या आंब्यांच्या सुरक्षेसाठी शिकारी कुत्रे आणि सशस्त्र रक्षक तैनात केल्याची चर्चाही देशभर गाजली होती. (World's Most Expensive Mango)


पोलीस सेवेनंतर निवांत आयुष्य निवडण्याऐवजी आधुनिक शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग स्वीकारत किसनराव नजन पाटील यांनी अनेकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीसोबत उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. (World's Most Expensive Mango)

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि