Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला. रेल्वे रुळालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत वस्त्या हटवण्यासाठी प्रशासन आणि पालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. कारवाई रोखण्यासाठी संतप्त जमावाने प्रशासन आणि पोलिसांच्या दिशेनं बादल्या, पाण्याच्या बाटल्या तसेच घरातील विविध वस्तू फेकून जोरदार विरोध दर्शवला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.



गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली होती. काही ठिकाणी चार मजली इमारती तर काही भागात मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या पाहणीत समोर आलं आहे. यापूर्वी पालिकेनं संबंधितांना नोटिसा बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात आलं नसल्याने प्रशासनाने अखेर मोठी तोडक कारवाई सुरू केली. या मोहिमेत काही अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.



पालिकेच्या नियोजनानुसार दोन दिवसांत झोपडपट्टी परिसरातील सुमारे ५०० घरांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १०० घरांना तात्पुरतं संरक्षण देण्यात आल्यानं त्या घरांवर सध्या कारवाई होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या प्रवासी संख्येमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. सध्या मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर वाढत्या गर्दीचा ताण जाणवत असून अतिरिक्त टर्मिनल स्टेशन आणि नव्या प्लॅटफॉर्मची गरज निर्माण झाली आहे.



याच पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनसच्या विस्ताराचं काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या असलेलं डिझेल शेड स्थलांतरित करून त्या जागेवर नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सात विद्यमान प्लॅटफॉर्मच्या पुढे आणखी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात अधिक गाड्या हाताळणं शक्य होणार आहे. प्रशासनानं ही संपूर्ण तोडक कारवाई १९ मे ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि