Wednesday, May 20, 2026

Shocking Crime : माणुसकीला काळिमा! ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या; आई-वडील फरार

Shocking Crime : माणुसकीला काळिमा! ५ वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या; आई-वडील फरार

Crapatti SambhatthajiNagar : छत्रपती संभाजीनगर येथे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून या प्रकरणात स्वतः मुलाचे आई-वडील संशयित असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर दोघेही फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे आई-वडील रोजगाराच्या शोधात सुमारे आठ दिवसांपूर्वी शहरात आले होते. मात्र आर्थिक अडचणी आणि मुलाच्या अपंगत्वामुळे ते दोघेही मानसिक तणावाखाली होते. या परिस्थितीला कंटाळून त्यांनीच मुलाची निर्दयी हत्या केल्याचा प्राथमिक माहिती आहे.

शेतात आढळला मुलाचा मृतदेह

ही धक्कादायक घटना हरसूल सावंगी बायपास परिसरात उघडकीस आली. स्थानिकांना एका शेतात मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

गळा आवळून हत्या केल्याचा संशय

प्राथमिक तपासात मुलाचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण झाल्याचेही स्पष्ट झाले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी मुलाच्या हातात खाऊच पाकीट असल्याचेही समोर आले आहे.

आरोपी आई-वडिलांचा शोध सुरू

घटनेनंतर आरोपी आई-वडील फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. शहरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहितीदारांची मद्दत घेण्यात आली आहे. दरम्यान,या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिव्यांग मुलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा असून समोर आला आहे, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment