Wednesday, May 20, 2026

Lahore Roads Renamed : लाहोरमध्ये मोठा बदल! अनेक रस्त्यांचे नामकरण; अनेक रस्त्यांना फाळणीपूर्वीची जुनी नावं पुन्हा एकदा बहाल

Lahore Roads Renamed : लाहोरमध्ये मोठा बदल! अनेक रस्त्यांचे नामकरण; अनेक रस्त्यांना फाळणीपूर्वीची जुनी नावं पुन्हा एकदा बहाल

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोर शहरात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब प्रांतीय सरकारने लाहोरमधील अनेक रस्ते आणि परिसरांना फाळणीपूर्वीची मूळ नावं पुन्हा देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हिंदू आणि शीख वारशाशी संबंधित अनेक ऐतिहासिक नावांचं पुनरागमन होत आहे. (Lahore Roads Renamed)

ही मोहीम ‘लाहोर हेरिटेज एरियाज रिव्हायव्हल प्रोजेक्ट’ अंतर्गत राबवण्यात येत असून, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला आहे. १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू आणि शीख संस्कृतीशी संबंधित अनेक रस्ते, चौक आणि भागांची नावं बदलून इस्लामी किंवा राष्ट्रवादी स्वरूपाची करण्यात आली होती. आता त्यातील अनेक ऐतिहासिक नावं पुन्हा बहाल केली जात आहेत. (Lahore Roads Renamed)

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने नव्या फलकांची उभारणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. (Lahore Roads Renamed)

पुन्हा बहाल करण्यात आलेली काही महत्त्वाची नावं पुढीलप्रमाणे :

- इस्लामपुरा पुन्हा ‘कृष्णनगर’ - बाबरी मशीद चौक आता पुन्हा ‘जैन मंदिर चौक’ - सुन्नत नगरचं नाव पुन्हा ‘संत नगर’ - मुस्तफाबाद आता पुन्हा ‘धरमपुरा’ - मौलाना जफर अली खान चौक पुन्हा ‘लक्ष्मी चौक’ (Lahore Roads Renamed)

याशिवाय काही ब्रिटिशकालीन नावंही पुन्हा बहाल करण्यात आली आहेत.

- सर आगा खान रोडचं नाव पुन्हा ‘डेव्हिस रोड’ - फातिमा जिन्ना रोड आता पुन्हा ‘क्वीन्स रोड’ - बाग-ए-जिन्ना पुन्हा ‘लॉरेन्स गार्डन्स’ - ग्रेटर इक्बाल पार्कचं नाव पुन्हा ‘मिंटो पार्क’ करण्यात येणार आहे. (Lahore Roads Renamed)

तसेच क्विन्स रोड, जेल रोड, लॉरेन्स रोड, एम्प्रेस रोड, कृष्णनगर, संतनगर, धरमपुरा, राम गल्ली, लक्ष्मी चौक, जैन मंदिर रोड, मोहनलाल बाजार, भगवानपुरा आणि शांतिनगर यांसारख्या अनेक भागांची ऐतिहासिक ओळख पुन्हा जिवंत केली जात आहे. (Lahore Roads Renamed)

याशिवाय नवाज शरीफ यांनी लाहोरमधील ऐतिहासिक क्रिकेट मैदानं आणि जुनं कुस्ती मैदान पुन्हा सुरू करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लाहोरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (Lahore Roads Renamed)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >