LSG VS RR : आज आपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध लखनऊमध्ये निर्णायक लढत, निकालाचा परिणाम पंजाबवर होणार..

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये ६४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंटस यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानिसिंह स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. राजस्थानसाठी हा सामना डू ओर डाय आहे. जर राजस्थानचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफ आव्हान संपुष्टात येईल आणि याचा थेट फायदा पंजाब किंग्सला होईल. मात्र राजस्थानला घरच्या मैदानवर या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही.


रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने आतापर्यंत १२ पैकी सहा सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह राजस्थान पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी २ सामने जिंकण्याची गरज आहे. दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनउ अपेक्षीतप्रमाणे कामगिरी करु शकली नसल्याने प्लेऑफ रेस मधून बाहेर झाली आहे. संघाने १२ पैकी फक्त चार सामने जिंकले आहे. त्यामुळे ते या सामन्यात फियरलेस क्रिकेट खेळताना दिसू शकतात. याचा थेट फायदा पंजाब किंग्सला होणार आहे. राजस्थानसाठी वैभव सुर्यवंशीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२ सामन्यात ४८६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने १२ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊसाठी मिचेल मार्शने १२ सामन्यात ४६७ धावा केल्या आहेत. तो या हंगामात लखनऊसाठी सर्वधिक धावा करणार फलंदाज ठरला आहे. प्रिन्स यादवने लखनऊसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १२ सामन्यात १६ विकेट्स घेतले आहे.



हेड टू हेड


आयपीएल इतिहासात या दोंघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. यात राजस्थानने पाच आणि लखनउने दोन सामने जिंकले आहेत. या हंगामात इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने लखनऊचा पराभव केला होता.


निकालाचा परिणाम राजस्थानवर होणार ?

पंजाब किंग्स सध्या १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सलग सहा सामन्यात पराभवाने पंजाब किंग्सला दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहवे लागत आहे. राजस्थानचा जर आज पराभव झाला, तर याचा थेट फायदा पंजाबला होणार आहे.


पीच रिपोर्ट


सवाई मानसिंहच्या खेळपट्टीवर नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळतो. बाउन्स आणि वेगवान आउटफिल्डमुळे फलंदाजांसाठी शॉट खेळणे सोपे होते.या मैदानावर आयपीएलमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 166 धावा राहिली आहे, तर दुसऱ्या डावात सरासरी 150-160 धावांच्या दरम्यान आहे. येथे आतापर्यंत आयपीएलचे 67 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 24 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 43 सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.



संभाव्य प्लेइंग-XI


राजस्थान- यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, रवि सिंग, शुभम दुबे, दसुन शनाका, जोफ्रा आर्चर, बृजेश शर्मा आणि यश राज पूंजा.
इम्पॅक्ट- शुभम दुबे.


लखनऊ- मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, एडन मार्करम, ऋषभ पंत, मुकुल चौधरी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मयंक यादव आणि प्रिन्स यादव.
इम्पॅक्ट- दिग्वेश सिंग राठी.



Comments
Add Comment

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.