Ruchira Jadhav : काळ्या ब्लेझरमध्ये रुचिरा जाधवचा बोल्ड अंदाज; कॅप्शनचीही चर्चा

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिचं नाव घेतलं जातं. आपल्या अभिनयासोबतच बोल्ड आणि स्टायलिश अंदाजामुळे रुचिरा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग असून, तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो.


बोल्ड आणि ब्युटीफुल अशी ओळख असलेली रुचिरा जाधव हिला अनेक तरुणी तिच्या फॅशन सेन्सला फॉलो करताना दिसतात. पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न स्टाइल, रुचिरा प्रत्येक अंदाजात चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.







रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिनं अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर ‘तू ही रे, माझा मितवा’ या मालिकेत तिनं साकारलेली खलनायिकेची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.


मालिकांसोबतच रुचिरानं काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आता ती एका नव्या मराठी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा एका खास फोटोशूटमुळे जास्त चर्चेत आली आहे.



नुकतंच रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिनं सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि ओव्हरसाइज ब्लेझरमध्ये केलेल्या या फोटोशूटनं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे.


विशेष म्हणजे, रुचिरानं या फोटोशूटमध्ये नो-ब्रा लूक कॅरी केला असून, तिचा हा आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या हटके स्टाइलमुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


या फोटोंसोबत रुचिरानं दिलेलं कॅप्शनही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. “जेव्हा तुम्हाला माहीत असतं की, तुम्ही वादळालाही शांत करू शकता...” असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

Comments
Add Comment

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या