मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत उद्या साताऱ्यात ५ लाख घरांचे लोकार्पण;

मंत्री जयकुमार गोरे यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी


सातारा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या ३० लाख घरांपैकी ५ लाख घरे पूर्ण झाली असून, या घरांचे लोकार्पण तसेच योजनेसाठी ₹१० हजार कोटी निधी वितरणाचा भव्य कार्यक्रम उद्या दि. १५ मे २०२६ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी आज सातारा येथे कार्यक्रम स्थळाची पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. विविध यंत्रणांशी समन्वय साधत लाभार्थी, नागरिक आणि मान्यवरांच्या सोयी-सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच इतर आवश्यक बाबींवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.


उन्हाची तीव्रता लक्षात घेता कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, सावलीसाठी मंडप, वैद्यकीय सुविधा तसेच नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषीकेश धायगुडे-पाटील, भाजप सातारा लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, भाजप सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम, जिल्हा परिषद सदस्य धनाजी काका पाटील, भाजप सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा सुरभीताई भोसले, सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांच्यासह विविध मान्यवर, जिल्हा परिषद सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर