कोल्हापूर : लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात आणि चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो. नुकत्याच कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या त्यांच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रम सुरू असतानाच एक चाहता अचानक स्टेजवर चढला आणि सोनू निगम यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. या संपूर्ण प्रकारानंतर आता स्वतः सोनू निगम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
अकोला : 'ऐका ना...' म्हणत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी लोकप्रिय यूट्यूबर (YouTuber) स्वानंदी सरदेसाई हिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ...
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक चाहत्याची एन्ट्री
गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये सोनू निगम आपल्या लोकप्रिय गाण्यांचं सादरीकरण करत होते. प्रेक्षकही मोठ्या उत्साहात त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत होते. मात्र, परफॉर्मन्स रंगात आला असतानाच एक चाहता अचानक स्टेजवर चढला. त्याने थेट सोनू निगम यांच्या जवळ जात त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही क्षणांसाठी कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सोनू निगम यांना गाणं थांबवावं लागलं.
दरम्यान, सुरक्षा रक्षक त्या चाहत्याला स्टेजवरून खाली घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावले. परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असतानाच सोनू निगम यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी त्या चाहत्यावर राग व्यक्त केला नाही, उलट हसत परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट आणि ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे ...
सोनू निगम यांची प्रतिक्रिया चर्चेत
View this post on Instagram
विशेष म्हणजे, काही क्षणांनंतर तो चाहताही सोनू निगम यांच्यासोबत गाणं म्हणताना दिसतो. या व्हिडिओसोबत सोनू निगम यांनी एक खास संदेशही लिहिला. त्यांनी म्हटलं, “प्रेक्षकांनो, मार खाण्याची कामं का करता?… मी तुम्हाला या वेळी वाचवलं, पण प्रत्येक वेळी वाचवू शकत नाही.”
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी त्या चाहत्याच्या कृतीवर टीका केली असून, अशा प्रकारचं वर्तन चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सोनू निगम यांनी ज्या शांततेने आणि विनम्रतेने परिस्थिती हाताळली त्याचंही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.




