NCP's new executive committee : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळांचे नाव गायब?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीबाबतचे त्यांचे नवे पत्र व्हायरल झाले असून, त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांचे नाव गायब असल्याचे समोर आले आहे. मात्र, हे पत्र व्हायरल होताच पक्षात मोठी धावपळ सुरू झाली असून, ही निव्वळ 'तांत्रिक चूक' असल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसने २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला नवीन कार्यकारिणीची यादी दिल्याचे एक पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख असून, जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, पक्षाचा मुख्य चेहरा असलेल्या प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नावे या यादीतून वगळण्यात आल्याचे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.


सोशल मीडियावर हे पत्र वाऱ्यासारखे पसरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. "माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक आणि कारकुनी चूक झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल," असे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणामुळे तूर्तास या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी इतक्या महत्त्वाच्या पत्रात एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे.




पार्थ आणि जय यांच्यावर मोठी जबाबदारी

व्हायरल झालेल्या यादीत पार्थ आणि जय पवार या युवा नेतृत्वाला महत्त्वाची पदे दिल्याचे दिसत असल्याने, भविष्यात पक्षाची धुरा नवीन पिढीकडे सोपवण्याची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आता सुधारित यादीत कोणाला स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Vinod Tawde : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे देशभरात एक महिन्याचे ‘सेवा संकल्प अभियान’

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी देशभरात

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील