Nashik : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या निदा खान (Nida Khan) ४३ दिवसानंतर ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी सुरु आहे. आज तिची पोलीस कोठडीची मदत संपणार असून तिला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआटीच्या तपासात निदा खान बाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Nashik TCS Case :टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित्त निदा खानच्या अटकेनंतर अनेक गौप्यस्फोट समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ...
विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र
तपासासाठी निदा खानचा मोबाईल जप्त करण्यात आला असून या मोबाईल मधून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. निदाने पीडितेच्या मोबाईलवर तब्बल १७१ वादग्रस्त लिंक्स पाठवल्या होत्या. या लिंक्सच्या माध्यमातून पीडितेच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल न्यूनगंड निर्माण करणे आणि विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र राबवण्यात आले होते. या डिजिटल पुराव्यांमुळे धर्मांतरासाठी वापरले जाणारे हे नवे ‘मॉडेल’ आता समोर आले आहे.
निदा स्वतः पीडितेला विशिष्ट धर्माचे शिक्षण देत होतीदेवळाली कॅम्पमधील (Devlali Camp) पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेचे नामकरण ‘हानिया’ असे केले होते. इतकेच नाही, तर निदा स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थनांची सक्ती करणे, अशा कृती करत होती. पीडितेला पूर्णतः प्रभावाखाली घेण्यासाठी निदाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर अखेर नाशिकमध्ये रविवारी विशेष पोलीस पथकाच्या (एसआयटी) चौकशीला सामोऱ्या गेल्या. या ...
निदा, दानिश आणि तौसिफ यांची समोरासमोर चौकशी होणार
दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे या गुन्ह्यातील मुख्य संशयित आहे, या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांत आणखी वाढ केली आहे. निदा खानची आज पोलीस कोठडी संपणार आहे, दरम्यान एसआयटीने जप्त केलेल्या १७१ लिंक्सचा तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटी तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत.






