शायना एनसी राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्ष?

लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत झाली बैठक


मुंबई (सुहास शेलार) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदावर शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील जागावाटपानुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून, या पदासाठी शायना एनसी लवकरच घड्याळ हाती घेणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत शायना एनसी यांनी मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्याकडून पराभूत झाल्यापासून त्या शिवसेनेच्या माध्यमातून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होत्या. सुरुवातीला त्यांनी राज्यसभेसाठी प्रयत्न करून पाहिले. मात्र, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्यानंतर विधान परिषदेच्या संधीनेही हुलकावणी दिल्याने त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर आता थेट महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.


'देवगिरी'वर खलबते : या संभाव्य नियुक्तीबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शायना एनसी यांची 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, शायना एनसी यांचे घर देवगिरीच्या अगदी शेजारीच आहे. या भेटीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शायना एनसी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला भाजप श्रेष्ठींनीही हिरवा कंदील दाखवला आहे.


चर्चेतील अन्य नावे मागे पडणार? : रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शायना एनसी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास या अन्य स्पर्धकांना प्रतीक्षा करावी लागेल. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत असून, त्याबाबतचा निर्णयही लवकरच अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : २६/११च्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात अनुपस्थितीत खटल्याची प्रक्रिया सुरू, ॲड. उज्ज्वल निकम यांची माहिती

Jalgaon : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आता भारतातच

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik Crime : प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात गेली अन्...; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात