Vaibhav Sooryavanshi : आयपीएलच्य दिग्गजांमध्ये वैभवचे वर्चस्व , आता पोलार्डचा विक्रम मोडण्याची संधी

जयपूर: आयपीएल २०२६ मध्ये आज गुजरात आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे . या सामन्यात राजस्थानचा वैभव सूर्यवंशी नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी सज्ज झाला आहे . तो पोलार्डच्या षटकारांच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. त्याने आता पर्यंत २७ टी-२० मध्ये ९९ षटकार मारले आहेत. हे करताना त्याने फक्त ५११ चेंडूंचा सामना केला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कायरॉन पोलार्डच्या नावावर होता. पोलार्डने ८४३ चेंडूंमध्ये १०० षटकार मारले होते.


वैभव सूर्यवंशी यंदाच्या हंगामात चांगल्या लयीत दिसत आहे . त्याने राजस्थानसाठी या हंगामात १० सामन्यांत २३७ च्या स्ट्राईक रेटने ४०४ धावा केल्या आहेत. तो राजस्थानसाठी या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. विशेष म्हणजे, त्याने ३५० पेक्षा अधिक धावा फक्त चौकार आणि षटकाराच्या जोरावर केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.



आयपीएलमध्ये वैभवची कामगिरी


वैभव सूर्यवंशीने गेल्या हंगामात १९ एप्रिल २०२५ ला लखनऊ विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत. आयपीएलच्या १७ सामन्यात त्याने ६५६ धावा केल्या आहेत यात २ शतकं आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. वैभवने आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम मुरली विजयच्या नावावर होता. त्याने आयपीएलच्या अवघ्या १५ डावात ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपाीएल इतिहासात सर्वात जलद ५०० धावा करणारा फलंदाज आहे.आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभवचा समावेश आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल आहे. वैभवची आयपीएलमधील ही कामगिरी बघता लवकरच त्याचा भारताच्या टी २० संघासाठी विचार होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Joe Root Test Stats : १३ धावा अन् महाविक्रम! जो रूट करणार सचिन तेंडुलकरची बरोबरी ?

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root) एका ऐतिहासिक टप्प्यावर

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.