Saturday, May 9, 2026

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून राजस्थानने कर्णधार रियान परागलाच वगळले आहे. संघाचे नेतृत्व यशस्वी जयस्वालकडे सोपवण्यात आले आहे.

काय म्हणाला राजस्थानचा नवा कर्णधार ?

यशस्वी जयस्वालने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. नाणेफेकीनंतर प्रतिक्रिया देताना त्याने इथल्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करायला आवडेल असे सांगितले. रियान परागला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे वगळले असल्याची माहिती त्याने दिली. तो लवकरच पुनरागमन करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. गुजरात विरूद्धच्या सामन्यासाठी शिमरॉन हेटमायर आणि यश राज पुंजाचा संघात समावेश केला आहे. संघाकडून चांगली कामगिरी होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या गुजरातने २० षटकांत चार विकेट गमावून २२९ धावा केल्या आणि राजस्थानपुढे २० षटकांत २३० धावा करण्याचे आव्हान ठेवले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >