Thursday, May 7, 2026

Nashik TCS Case : मोठी बातमी! नाशिक हादरवणाऱ्या TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अखेर बेड्या

Nashik TCS Case : मोठी बातमी! नाशिक हादरवणाऱ्या TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अखेर बेड्या

नाशिक : नाशिक येथील बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या संयुक्त कारवाई करत ही मोठी कामगिरी बजावली.

अशी झाली अटक

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) नायगाव परिसरात लपून बसली होती. याची खात्री होताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि संध्याकाळच्या सुमारास तिला ताब्यात घेतले. अटकेनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिकमधील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या 'TCS' मध्ये काम करणाऱ्या काही तरुणांना टार्गेट करून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात निदा खानवर तरुणांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण समोर आल्यापासूनच नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान पोलिसांना चकवा देऊन फरार झाली होती. तिच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली होती. निदा खानच्या अटकेमुळे या धर्मांतर प्रकरणामागे नेमके कोणते रॅकेट सक्रिय आहे का? तसेच तिला कुणाचे पाठबळ मिळत होते? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. नाशिक पोलीस आता तिची सखोल चौकशी करणार असून, या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >