Wednesday, May 6, 2026

Suvendu Adhikari's PA Murder : बंगालची निवडणूक संपली अन् रक्ताचा थरार रंगला, शुभेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या

Suvendu Adhikari's PA Murder : बंगालची निवडणूक संपली अन् रक्ताचा थरार रंगला, शुभेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर झाला. निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. या घटनेला ४८ तास उलटत नाहीत तोच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. ममता बॅनर्जींना निवडणुकीत हरवणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या झाली. अतिशय जवळून अधिकारी यांच्या पीएवर गोळ्या झाडण्यात आल्या.

शुभेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या

हत्या झालेले शुभेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसोबत जात होते. वाटेत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या 3 हल्लेखोरांनी दोहारिया परिसरात त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. संधी साधून त्यांनी गाडीला वेढा घातला आणि जवळून अनेक गोळ्या झाडल्या. मध्यग्राममधील दोहरिया इथे ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी एकूण १२ गोळ्या झाडल्या असून रथ यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या चंद्रनाथ यांच्या डोक्याला छातीला आणि पोटाला गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी बुद्धदेव बेर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते. भवानीपूर विधानसभा निवडणुकीत एक महत्वाचे सदस्य म्हणू त्यांची नियुक्ती केली गेली होती. शिवाय एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.

या घटनेनंतर बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून 'राजकीय हत्येच्या दृष्टीने या घटनेकडे पहिले जात आहे. चंद्रनाथ रथ यांची हत्या ही पूर्वनियोजित होती, त्यांच्या पाठलाग करून त्यांची हत्या केली, या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजपचे नेते अर्जुन सिंग यांनी केला आहे.

या घटनेनंतर शुभेंदू अधिकरी यांच्या प्रतिक्रिया

माझ्या सहाय्यकाच्या हत्येबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना माहिती दिली आहे. माझ्या सहाय्यकाव्यतिरिक्त, बसीरहाट येथे आमच्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला, तर बारानगर येथे दुसऱ्या एका कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. माझ्या सहाय्यकाच्या या निर्घृण हत्येचा पोलीस तपास करतील, असे आश्वासन पोलीस महासंचालकांनी (DGP) मला दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >