Jalna Crime : अंघोळ करताना व्हिडिओ काढायचा; पीडितेवर सलग १० वर्ष अत्याचार जालनामध्ये भयानक प्रकार उघड...

जालना : पुणे, अकोला आणि आता जालना मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची भयानक मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्र या घटनांनी हादरून गेला आहे. राज्यभर संतापाची लाट उसळत आहे. असाच एक संतापजनक, माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार जालनामध्ये घडला आहे. शिवाय लव्ह जिहाद हा देखील मुद्दा या घटनेत सामावलेला आहे.



नेमकी घटना काय ?


सतत १० वर्षांचा अत्याचार आणि धर्म बदलण्याची सक्ती पीडितेला असह्य झाली. २०१६ पासून सुरु असलेल्या या ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराला पीडितेने हिंमत एकवटून पोलिसांसमोर वाचा फोडली आहे. २०१६ मध्ये पीडिता नववीत शिकत होती. घरात कोणी नव्हते, पीडिता अंघोळ करत होती, त्या संधीचा फायदा उचलत एका मुस्लिमने शेख इम्रान शेख हबीब याने घरात घुसून तिचे विवस्त्र फोटो काढले. फोटो शाळेत दाखवण्याची धमकी देत, पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.


जाचाला कंटाळून गाव देखील बदलले परंतु तिथे आरोपीने तिचा पिच्छा सोडला नव्हता. मार्च २०१८ मध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पुन्हा सर्व मर्यादा ओलांडत ८ मार्च २०२६ ला पीडितेला अमानुष मारहाण केली.



शेखच्या कुटुंबाचा धर्म बदलण्यास दबाव


आरोपीच्या संपूर्ण कुटुंब या प्रकरणात सामील होते. पीडितेला धमकी देत घरी बोलावून घेतले. आणि हिंदू धर्मापेक्षा आमचा धर्म चांगला असे म्हणत तिला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केले. तिला बुरखा घालायला जबरदस्ती केली जात होती. तिच्याकडून नमाज तसेच कुराण पठण करण्याची सक्ती केली जात होती.


आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला अटक करण्यात आहे. पोलीस अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांनवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.