मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी २३ मे रोजी पाकिस्तानमध्ये दाखल होणार आहे. आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याला दुजोरा दिला. पीसीबीनुसार, ऑस्ट्रेलियन संघ २३ मे रोजी इस्लामाबादमध्ये दाखल होईल. त्यावेळी आयपीएलचा साखळी टप्पा पूर्ण झालेला असेल, तर प्लेऑफचा टप्पा सुरू होणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएलमधून अनुपस्थित राहतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रमुख क्रिकेटपटू आयपीएल २०२६ मध्ये खेळत आहेत. त्यामुळे, पाकिस्तानला जाणाऱ्या संघात ऑस्ट्रेलियाच्या अनेक प्रमुख क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार नाही. ज्या फ्रँचायझी प्लेऑफमध्ये पोहोचणार नाहीत, ते क्रिकेटपटू पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी संघात सामील होऊ शकतात. मिचेल मार्श, लखनऊ सुपर जायंट्सचा जोश इंग्लिस आणि केकेआरचा कॅमेरॉन ग्रीन संघात सामील होऊ शकतात. लखनऊ आणि केकेआरच्या आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे.