Wednesday, May 6, 2026

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ५० वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजोबांनीच आपल्या ९ वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. चिमुकलीचे आई वडील कामावर जात असल्याने त्यांनी आपल्या मुलीला आजोबांपाशी ठेवलं होतं.

पोलिसांकडून आरोपीला अटक :

पोलिसांनीही तत्परता दाखवत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे नसरापूरच्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आल्याने पुण्यात नेमकं काय चाललंय, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा