नाशिक : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीने आज ४.४४ वाजता धर्मध्वज स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.
धर्मध्वज स्थापना कार्यक्रमास सकाळपासून सुरुवात झाली असून दुपारी चारपर्यंत विधीवत पूजन होईल. यासाठी प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौराेहित्य शांताराम भानोसे, पं. दिनेश गायधनी करणार आहेत. पुरातन ध्वज १९६२ साली मंदिरात स्थापित झाला होता. वातावरणातील बदलाने सद्यस्थितीत तो जीर्ण अवस्थेत असल्याने धर्मध्वजारोहण होत आहे. जवळपास काळाराम मंदिरात ६४ वर्षांनंतर नवा धर्मध्वज उभारण्यात येणार आहे.
जागतिक बाजार आज सकारात्मक संकेत दर्शवत आहेत. अमेरिकन बाजार मागील सत्रापेक्षा वाढीसह बंद झाले. डाऊ जोन्स फ्युचर्समध्येही आज तेजी अपेक्षित आहे. ...
६४ वर्षांनंतर नवा धर्मध्वज उभारण्यात येणार
श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा (Shri Kalaram Temple Devasthan) प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येणार आहे. १९६२ साली धर्मध्वज उभारण्यात आला होता. वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला आहे. धर्मस्तंभ (ध्वजस्तंभ) अयोध्या येथील नमुन्यावर तसेच धर्मशास्त्रावर आधारित असून सुमारे २१ फूट उंचीचा पितळी (ब्रास) स्तंभ असेल. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय ११ फूट असेल; या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केलेले आहे. धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीतील परंपरा असून धर्म, सत्य, शौर्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे; यानिमित्ताने वेदघोष, पूजन-विधी व धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली.
दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके (Mayor Himgauri Adke), पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला.
नाशिक : टीसीएस प्रकरणातील चौघांना संशयितांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, ...
काळाराम मंदिर
नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिर हे १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी काळ्या पाषाणात उभारलेले भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक आणि जागृत मंदिर आहे. गोदावरी नदीच्या काठावर, प्रभू राम वनवासात राहिले होते, त्या ठिकाणी हे मंदिर आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मणाच्या काळ्या मूर्ती आहेत, तसेच हे मंदिर सामाजिक सुधारणांचा साक्षीदार आहे. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात स्थित आहे.
जुन्या लाकडी मंदिराच्या जागी १७८२ मध्ये पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले, ज्यासाठी सुमारे १२ वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात (Black stone) केलेले आहे. हे १८ व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत [८].मुख्य सण: रामनवमी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे, जो चैत्र महिन्यात साजरा केला जातो.





