Manoj Tiwary : मनोज तिवारी यांचा तृणमूल काँग्रेसला रामराम

पश्चिम बंगाल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करत, तिकीटासाठी मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा दावाही केला आहे.


मनोज तिवारी यांनी आरोप केला की, या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी मोठी रक्कम दिली. ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता, त्यांनाच तिकीट मिळाले. यावेळी किमान ७० ते ७२ उमेदवारांनी प्रत्येकी सुमारे ५ कोटी रुपये दिले. माझ्याकडूनही पैसे मागण्यात आले, पण मी नकार दिला, असे तिवारी म्हणाले. तिवारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मंत्रीपदाबाबत नाराजी व्यक्त करत ते केवळ “नावापुरते” असल्याचे सांगितले. राज्यमंत्रीपद म्हणजे फक्त एक ‘लॉलीपॉप’ होते. कोणत्याही बैठकीत आमच्या मतांना महत्त्व दिले जात नसे, असा आरोपही त्यांनी केला. तिवारी यांनी टी एमसीमध्ये अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोपही केला. मी बैठकीत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, तर मध्येच थांबवले जायचे. ‘माझ्याकडे वेळ नाही’ असे सांगितले जायचे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, हावडा जिल्ह्यातील ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्थेच्या समस्येकडेही लक्ष वेधले. मी वारंवार प्रयत्न करूनही या समस्यांचे निराकरण झाले नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे