Raghu Sharma Celebration : गोलंदाज रघु शर्माची चिठ्ठी व्हायरल, सूर्यकुमारसह सर्वांनी वाचली चिठ्ठी

मुंबई : आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयामुळे सहा गुणांसह मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानी कायम आहे तर लखनऊ चार गुणांसह दहाव्या स्थानी आहे. या सामन्यात मुंबईच्या विजयापेक्षा रघु शर्माने विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा जास्त होत आहे.



नेमकं चिठ्ठीत काय लिहिले होते ?


सामन्यामधील दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात रघुने पहिल्याच चेंडूवर अक्षतला बाद करत सेलिब्रेशन केले होते. रघुने अक्षतला बाद केल्यानंतर आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढून मुंबईच्या डगआऊटच्या दिशेनं दाखवली. रघुने चिठ्ठीत काय लिहिलं आहे हे पाहण्यासठी कर्णधार सूर्यकुमार यादवही अगदी वाकून पाहत होता. या चिठ्ठीमधील मजकूर थोड्या वेळात उघडकीस आला.गुरुदेवांच्या कृपेने, अत्यंत वेदनादायी अशी १५ वर्षे आज संपुष्टात आली. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम, असा मजकूर या चिठ्ठीत होता.






कोण आहे हा रघु शर्मा ?


रघु शर्मा हा प्रामुख्याने उजव्या हाताने लेग-ब्रेग गोलंदाजी करतो. पंजाबमध्ये जन्मलेला रघु हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये पंजाब, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या संघांचे प्रतिनिधित्व करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७ विकेट्स घेतल्या असून ७/५६ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो एक कंडिशनिंग ट्रेनर देखील आहे. त्याला मुंबईने २०२५ च्या आयपीएमध्ये जखमी खेळाडू विघ्नेश पुथुरच्या जागी संघात सहभागी झाला होता. सध्या तो त्याच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे .

Comments
Add Comment

यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूला का नडला? ध्रुव जुरेलने बाहेर काढला जुना किस्सा

भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा दिमाखदार पराक्रम; जपानचा 3-1 ने धुव्वा उडवत गाठली उपांत्य फेरी!

गिफू : आशियाई खेळ 2026 मधील भारतीय महिला हॉकी संघाने उत्कृष्ट आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत नवा इतिहास रचला आहे.

किंग कोहली अडचणीत? वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात होऊ शकतो हा मोठा अनर्थ!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून

"लोक तुझा तिरस्कार करतील..." वीरेंद्र सेहवाग आपल्याच मुलाला असं का म्हणाला? नेमकं काय झालं?

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय आहे. भारतासाठी अंडर 19 संघात त्याची निवड झाली

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-विराट रचणार विक्रम, हा रेकॉर्ड रडारवर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा

Asian Games 2026 : सीमा कुमारीची ऐतिहासिक कामगिरी! महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत पटकावले कांस्यपदक

नागोया (जपान) :जपानमधील नागोया येथ