Petrol - Diesel Price : निवडणूक निकालांपूर्वी दिलासा! पेट्रोल-डिझेल दर अद्याप स्थिर
May 4, 2026 12:49 PM
petrol
मुंबई : सोमवार ४ मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या तरी तेल कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, आज पेट्रोल-डिझेल (Petrol - Diesel Price) भरणाऱ्यांना जुन्याच दराने पैसे मोजावे लागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढताना दिसत आहेत. ब्रेंट क्रूड सुमारे १०८.३० डॉलर प्रति बॅरलवर स्थिर आहे, तर यूएस क्रूड १०२ डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. या वाढत्या दरांचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Petrol - Diesel Price)