Sunday, May 3, 2026

IPL 2026 च्या प्लेऑफचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, BCCI कडून आली मोठी अपडेट....

IPL 2026 च्या प्लेऑफचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, BCCI कडून आली मोठी अपडेट....

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४४ साखळी सामने शनिवार २ मे पर्यंत खेळून झाले. यंदाच्या हंगामात ७० साखळी सामने रंगणार आहेत. हे सामने २४ मे पर्यंत होणार आहेत. यानंतर आयपीएलचे प्लेऑफचे सामने सुरू होतील. बीसीसीआयने अद्याप प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. यामुळे हे सामने कधी आणि कुठे होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे. आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच काही पोटनिवडणुका असल्यामुळे आयपीएलचे सामने जाहीर होण्यास वेळ लागला. पोलीस संरक्षणाच्या उपलब्धतेची खात्री झाल्यानंतर बीसीसीआयने वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले. यातील पहिल्या टप्प्याचे सामने झाले असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव देवजीत यांनी मोठी अपडेट दिली आहे. आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

नेमकं काय म्हणाले देवजीत ?

बोर्ड प्लेऑफ आणि फायनसाठी योग्य ठिकाण ठरवण्याच्या कामात गुंतले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत यांनी सांगितले. संभाव्य ठिकाणांविषयी माहिती देणे त्यांनी टाळले. आवश्यक ते नियोजन करण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत तर्कवितर्क करा. लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, असे देवजीत म्हणाले. प्लेऑफची ठिकाणं विचारपूर्वक निवडली जात आहेत. संरक्षणाची तसेच इतर आवश्यक नियोजनाची तयारी करून दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर करू, असे ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ च्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे, तर फायनल ३१ मे रोजी होणार आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेकडे आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा