चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा मार्गावरील बोडणीची डाग येथे एका तीव्र उतारावर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर पीकअप टेम्पोवर कोसळला. या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा चिरडून मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. (Srivardhan accident)


प्राथमिक माहितीनुसार, श्रीवर्धनच्या बागमांडला – बाणकोट खाडी वर पुलाचे काम सुरू असून नवी मुंबई येथून बागमांडला येथे पुलाचे साहित्य घेऊन जाणारा ट्रेलर चालक तौफेल सलाउद्दीन अहमद (कळंबोली) याने श्रीवर्धन म्हसळा हा घाट रस्ता व वळणदार तीव्र उताराचा असून देखील आपल्या ताब्यातील ट्रेलर (एम एच ४६ बी बी ४७१२) निष्काळजीपणे श्रीवर्धन च्या दिशेने आणत होता. (Srivardhan accident)


बोडणीची डाग येथील एका वळणदार तीव्र उतारावर चालकाचा ट्रेलर वरील ताबा सुटल्याने ट्रेलर ने अगोदर एका चारचाकी ला धडक दिली व आंबा वाहतूक करणाऱ्या एम एच ०६ जी ९३२० या क्रमांकाच्या महेंद्रा पीक अप टेम्पोवर थेट ट्रेलर कोसळला. या भीषण अपघातात बागमांडला येथील टेम्पो चालक अजय भालचंद्र जाधव (वय २५) हा जागीच ठार झालाय.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड