DJ company : डिजे वाजवणाऱ्या कंपनीला रस्त्यावरील रेलिंगचे कंत्राट

कुणाच्या दबावाखाली महापालिकेने दिले

शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी उबाठाची केली बोलतीच बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डिजे वाजवणाऱ्याला मुंबईतील रेलिंगची कामे कुणी दिली? तत्कालिन सहआयुक्त आशुतोष सलिर यांनी यावर आक्षेप नोंदवूनही हे काम संपूर्ण मुंबईत दिले गेले, तेच काम पुन्हा देण्याचा प्रयत्न होता. पण भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्र देवून हे काम रोखले याबद ल धन्यवाद मानत शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयातील २०० खाटांचे आयसीयू बेडचा विभाग रिलायन्स कंपनीला कुणी दिले? स्कर्टींग लाईटचे १८ कोटी रुपयांचे कंत्राट कुणी दिले होते? बेस्टचे प्रवासी घटण्यास कारणीभूत असलेल्या सिटी प्लो बसला मान्यता कुणाच्या काळात दिली असे सवाल करत विरोधी पक्षातील उबाठाची बोलतीच बंद करून टाकली

मुंबई महापालिकेच्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर भाषण करताना शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी केईएममधील नवजात बालक विभाग, ॉलेसेमिया विभाग बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच रोबोटीक सर्जरी अद्यापही आपल्याकडे सुरु झालेली नाही. चार महाविद्यालये असून त्या शिकाऊ डॉक्टरांसाठी रोबोटीक सर्जरी महत्वाची मानली जाते. त्यामुळे ही रोबोटीक सर्जरी विभाग सुरु न करून एकप्रकारे डॉक्टरांचा अपमान केला आहे. परंतु आजवर आपण केईएम रुग्णालयाला एम्सचा दर्जा देवू शकलो नाही, पण आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत केईएमला एम्सचा दर्जा देवू आणि हा मुंबईच्या आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल.

मुंबईत ५० ठिकाणी जेनेरिक औषधांची दुकाने सुरु केली जात आहेत, पण ही कामे शेतकरी संघटनेला दिल्याचे सांगतच घोले यांनी केईएम रग्णालयात आयसीआयसीआय बँकेकडून ५ कोटी रुपयांचा सीएसआर निधी मॅमोग्राफी मशिनकरता मिळाले आहे, ती मशिन त्वरीत खरेदी व्हायला हवी. तसेच मुदतठेवींबाबत समाचार अश्रफ आझमी यांचा समाचार घेताना मुदत ठेवींची रक्कम पब्लिक ट्रस्टमध्ये ठेवताना मर्यादा आहे. ही नफा कमवणारी संस्था नसून पुन्हा खर्च करण्यासाठी या मुदतठेवी ठेवल्या जातात. त्यामुळे पोस्टात किंवा अन्य ठिकाणी ठेवता येत नाही. त्यामुळे ज्यांना खर्चच करता आला तिथे मुदतठेवी वाढणारच असेही त्यांनी सांगितले.

२० वर्षांत १४ लाख कोटी रुपये कसे खर्च करणार- आझमी

मुंबईच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी चार वर्षांसाठी २ हजार कोटीं रुपयांची तरतूद केली होती, पण त्यात केवळ ७० कोटी रुपयेच खर्च झाल्याचे सांगत काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी २० वर्षांत १४ लाख कोटी रुपये कसे खर्च करणार असा सवाल केला.

केंद्रात काँग्रेसप्रणित सरकार असताना महापालिकेला ब्रिमस्टॉवड प्रकल्पांतर्गत ६७०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते, पण आता राज्यात आणि केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार आहे, तर मग कोस्टल रोड, विस्तारीत कोस्टल रोड, मलजल प्रक्रिया केंद्र, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण आदी प्रकल्प कामांना किती कोटी रुपयांचा निधी दिला असा सवाल आझमी यांनी केला.

सभागृहात समाजकारण, बाहेर राजकारण

मुंबईच्या विकासात राजकारण नकोय, राजकारण जिथे करायचे तिथे आम्ही करू, पण या सभागृहात विकासासाठी समाजकारण करण्यासाठी इथे आलोय असे सांगत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी गारगाई पाणी प्रकल्पावर आक्षेप नाही. शाळांच्या दुरुस्तीचा खर्च हा शाळांच्या पुनर्विकासाएवढाच असल्याचेही सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जी २०च्या नावाखाली महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचीही टीका त्यांनी प्रशासनावर केली. प्रत्येक विकासकाला ३ ते ४ झाडे लावणे बंधनकारकच करावे अशीही सूचना त्यांनी केली. समुद्र चौपाट्यांची धुप होवून वाळूही दिसेनासी झाली त्यामुळे एक दिवस त्सुनामी येवू मी पाण्याखाली जाण्याचीही भीती किल्लेदार यांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

Harbour Railway Delay : हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना रुळांवरून चालत स्टेशन गाठावे लागले

मुंबई : मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल (Local) सेवेला आज सकाळी मोठा फटका बसला. हार्बर मार्गावरील (Harbour Railways)

Powai Lake : पवई तलाव परिसराच्या लखलखाटासह कॅमेरांचीही दृष्टी सुधारणार

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पवई तलावाच्या (Powai Lake) ठिकाणी आता प्रेमी

BMC : शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आता सिविक सेन्स विकसित करण्यावर दिला जाणार भर

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे शिक्षण विभागाला निर्देश मुंबई : शाळांचा भौतिक दर्जा उंचावा म्‍हणून सहायक

Ashwini Bhide : मुंबईतील अपघात प्रवण आणि फ्लडींग स्पॉटवर विशेष लक्ष

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी

Ashwini bhide : नगरसेवकांच्या सहभागातून आता विहिरींमधील पाण्याचा वापर

  महापालिका आयुक्त भिडे यांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे निर्देश   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या

Municipal Commissioner's administration : महानगरपालिकेच्‍या अधिकारी - कर्मचा-यांना 'ए.आय.' बाबत प्रशिक्षण

महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : 'उपयोग ' हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी डिजिटल