Nashik Crime : भारतीय लष्कराच्या देवळाली कॅम्प रुग्णालयात ८२ लाखांच्या इन्शुलिनची चोरी

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवानांच्या उपचारासाठी पाठविलेल्या तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या महागड्या ‘इन्शुलिन’ इंजेक्शन्सची चोरी करून त्यांचा काळाबाजार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Deolali Camp Police Station)


धक्कादायक म्हणजे, दोन वर्षांच्या अंतर्गत तपासानंतर या प्रकरणाचा छडा लागला असून, यात एका निलंबित लष्करी शिपायाचा आणि एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Crime)


नेमकी घटना काय ?


मुंबईतील कांदिवली येथील आर्मीच्या मेडिकल स्टोअर डेपोतून मे २०२४ मध्ये देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलसाठी १३३ बॉक्समध्ये विविध प्रकारची औषधे पाठवण्यात आली होती. यामध्ये मधुमेह नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी अत्यंत महागडी ‘इन्शुलिन डेग्लुडेक’ आणि ‘ह्युमन इन्शुलिन’ अशी एकूण बारा हजार ६६२ इंजेक्शन्स होती. या औषधांची सुरक्षित ने आण करण्याची जबाबदारी संबंधित विभागावर असताना, संशयित नीरजने संगनमत करून ही औषधे परस्पर लंपास केली.


तत्कालीन लष्करी शिपाई नीरज सिंग (सध्या निलंबित) आणि सेवानिवृत्त कर्मचारी संशयित विनायक विठ्ठल कांबळे यांनी ही औषधे मिलिटी हॉस्पिटलमध्ये जमा करण्याऐवजी देवळाली कॅम्पच्या बनात चाळीतील घरी उतरवली. तेथे औषधांचे मूळ बॉक्स फोडून त्यांची पुन्हा ‘रि-पॅकिंग’ केली. ही औषधे टाटा एस टेम्पोतून (एमएच १५ जेसी ६१८१) पुण्यातील कलाशंकर नगरातील नीरज सिंग याच्या घरी पाठवण्याचा कट रचल्याचे आर्मी इंटेलिजन्सच्या तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आता प्रकरणाच तपास गुन्हे शोध पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. (Nashik Crime)


जप्त औषधांचा तपशील


५२ लाख १३ हजार रुपये किमतीचे १० हजार ६९८ नग ह्यूमन इन्शुलिन


१५ लाख ९७, हजार १२० रुपये किमतीचे ९७२ नग इन्शुलिन


१३ हजार ८८ हजार ८०० रुपये किमतीचे ९९२ मग इन्शुलिन


एकूण रक्कमः ८१ लाख ९९ हजार रुपये


दोन वर्षांच्या तपासानंतर कारवाई


या चोरीचा संशय आल्यानंतर लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील दोन वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. देवळालीतील हॉस्पिटलचे सिनिअर रजिस्ट्रार कर्नल दविंदर भारद्वाज यांच्या सूचनेनुसार सुभेदार रामराव निवृत्ती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीरजसह कांबळेवर गुन्हा नोंद झाल आहे.

Comments
Add Comment

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या