धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईची क्रूर हत्या केली आहे. विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. (Virar Crime News)


लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत नॅन्सी मिश्रा (वय 24) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय 45) राहत होत्या. मागील दोन वर्षांपासून आरोपी शिवम उपाध्याय (वय 25) आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शविला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला.


नॅन्सी आणि तिच्या आईकडून लग्नाला विरोध असल्याचे समजताच शिवमचा संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या आरोपीने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी व तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. (Virar Crime News)


घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाणेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली होती. घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनास पाठवले असून या दुहेरी हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

FIFA Leadership Crisis : फिफाची मोठी कारवाई, सीओओ केविन लार्मर यांना हटवले

नवी दिल्ली : फिफा, या जागतिक नियामक संस्थेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), केविन लार्मर यांच्याशी संबंध

Dhule Crime : २० हजारांची लाच घेताना साक्री पंचायत समितीच्या अभियंत्यासह ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

Dhule Crime : शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची

Nashik Accident News : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) दहाव्या मैलाजवळ