लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभासाठी निघालेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला. आनंदाचा क्षण असताना कुटुंबावर अशाप्रकारे दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून एका लग्न समारंभासाठी नांदे कुटुंब निघाले होते. वरूड ते मोर्शी महामार्गावरून प्रवास करत असताना खडका फाट्याजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि यानंतर ते भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात धडकले. ही धडक इतकी जोरात होती की वाहनाचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. (Amravati accident)

या दुर्दैवी अपघातात नांदे कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. किरण नांदे, समाधान नांदे, आणि दिया नांदे (३ वर्ष) अशी या तिघांची नावे आहेत. या अपघातात गोपाल नांदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या भीषण धडकेतून ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Amravati accident)

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. एका तीन वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाल्याने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 
Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या