Iran - America War : इराणवर मोठा दबाव! ट्रम्प यांचा थेट इशारा; पुढील ३ दिवस निर्णायक

इराणवरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला असून, पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडू शकतात असे संकेत दिले आहेत.


ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जर इराणला खनिज तेलाची निर्यात करता आली नाही, तर त्यांच्या तेलवाहिन्यांवर अंतर्गत दबाव निर्माण होऊन मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिकेने इराणवर लादलेल्या सागरी निर्बंधांमुळे सध्या तेथे आंतरराष्ट्रीय जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे, ज्यामुळे इराणची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा प्रणाली गंभीर संकटात सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे.



तेलवाहिन्यांबाबत बोलताना ट्रम्प यांनी तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या दाव्यानुसार, तेलाचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू राहिला आणि तो साठवण्याची व्यवस्था अपुरी राहिली, तर अंतर्गत स्फोटासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. पुढील तीन दिवस अत्यंत निर्णायक असल्याचेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला चर्चेचे आवाहन केले आहे. “इराणला संवाद साधायचा असल्यास ते थेट संपर्क साधू शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.


दुसरीकडे, ट्रम्प यांनी जॅरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा पाकिस्तान दौरा अचानक रद्द केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री Abbas Araghchi यांनी पाकिस्तान दौरा संपवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


सध्या होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे आणि अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे या अमेरिकेच्या अटींवर इराणने स्पष्ट नकार दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे.

Comments
Add Comment

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर