BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेचे स्टॉल्स जर अविवाहित व्यक्तीला दिले असतील तर ते स्टॉल्स संबंधित व्यक्तीच्या आई वडिलांच्या नावे केले जातील, परंतु कोणत्याही परिस्थिती भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.


">मुंबई महापालिकेने स्टॉल्स, इत्यादींचे परवाने हस्तांतरीत करण्यासंबंधातील विद्यमान धोरणामध्ये अविवाहित परवानाधारकाचे वारस म्हणून प्रथम त्यांचे आई, वडिल आणि ते हयात नसल्यास किंवा ते काम करण्यास असमर्थ असल्यास त्या अविवाहित परवानाधारकाची बहिण व भाऊ यांचा अंतर्भाव करण्यात यावा,अशाप्रकारची मागणी झाल्याने या धोरणांत अशा तऱ्हेने बदल करण्याची मागणी झाली होती. उबाठा शिवसेनेच्या तत्कालिन सभागृहनेत्या व विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे या धेारणात बदल करण्याची मागणी केली होती. मुंबईमध्ये दोन बाय एक मीटर क्षेत्रफळाचे स्टॉल्स चालवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवाने देण्यात आलेले आहेत. असे व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकाचे निधन झाल्या किंवा तो काम करण्यास असमर्थ ठरल्यास त्या परवान्याचे हस्तांतरण केवळ त्याच्या वारसाच्या म्हणजे पती, विधवा , मुलगा, मुलगी यांच्या नावे करता येईल असे महापालिकेचे धोरण आहे. परंतु अविवाहित परवानाधारकाचे निधन झाल्यास किंवा तो करण्यास असमर्थ ठरल्यास त्याच्या नावे असलेले स्टॉल्सच्या परवान्यांचे हस्तांतरण त्यांचे वारस म्हणून आई, वडिल, भाऊ, बहिण यांच्या नावे करण्याचा या धोरणात उल्लेखच नाही, या अविवाहित व्यक्तींचे आई, वडिल, भाऊ व बहिण हेच आधार असतात. त्यामुळे या सर्वांचा परवाना हस्तांतरणाच्या धोरणात समावेश करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी मागणी केली होती.



यावर प्रशासनाच्यावतीने माहिती देताना, स्टॉल्सचा परवाना हा स्टॉल्सधारकाला स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत परवान्यांचे हस्तांतरण हे कायदेशीर वारसा नावाने सांगण्यात येते. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवान्यांचे हस्तांतरण हे स्टॉल्सधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ असल्यास त्यांचे कायदेशीर नवरा, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे करण्यात येते. पण परवानाधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ झाल्यास नमुद केलेले वारस नसल्यास त्यांच्या आई, वडिलांच्या नावे करण्यासाठीचे परिपत्रक माहपालिकेच्यावतीने बनवून आयुक्तांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात आले आहे. त्यामुळे अविवाहित परवानाधारकांची बहिण व भाऊ यांच्या या धोरणात अंतर्भाव करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags
mumbaideathbmcbmc newsBMC stalllicensesunmarried personmother - father
Comments
Add Comment

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस