मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधी ऑफिसबॉयने उघड केलेल्या धक्कादायक माहितीच्या पार्श्वभूमीवर आता त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकनेही खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत राघव चड्ढा (Raghav Chadha) ...
या व्हिडिओमध्ये अशोक खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील लैंगिक शोषणाचे आरोप अधिक बळकट झाले आहेत. तपास अधिक खोलात जात असून, या व्हिडिओमधून आणखी गंभीर पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अटक झालेल्या खरात याची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासादरम्यान रोज नवे खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटीकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांना व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनरदरम्यान अचानक बाहेर ...
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अशोक खरात सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रश्न टाळणारा खरात आता “मला काही आठवत नाही” असे सांगत असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. यापूर्वीही डोकेदुखी आणि प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होणार आणि न्यायालय आज काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






