Thursday, April 23, 2026

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक खरातने भोंदुगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच इतरही प्रकरणांमध्ये भोंदू खरातची सखोल चौकशी सुरू आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. आता एका बड्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

काका कोयटे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेले समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काका कोयटे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते, मात्र काही दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात याचे समता पतसंस्थेशी कनेक्शन उघड झाल्यानंतर सभासदांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा समोर आली होती, त्यानंतर आता त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य पतसंस्था फेडरेशच्या अंतर्गत राज्यातील 15 हजार पतसंस्था काका कोयटे हे राज्य पतसंस्था फेडरेशच्या अध्यक्षपदी २०१५ च्या पूर्वीपासून होते. राज्य पतसंस्था फेडरेशच्या अंतर्गत राज्यातील 15 हजार पतसंस्था काम करतात. पतसंस्थेचे 6 हजार सभासद आहे. त्यामुळे काका कोयटे यांची ओळख आणि ताकद मोठी असल्याचे बोलले जात होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशोक खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आले होते, त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला होता, त्यामुळेच आता काका कोयटे पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून पायऊतार झाले आहेत.

मी खरातचा भक्त नाही – काका कोयटे समता पतसंस्थेत अशोक खरात एक दोन नाही तर तब्बल 100 खात्यांना नॉमिनी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. त्यासोबतच या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे देखील समोर आले होते. तसेच काका हे खरातचे भक्त असल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी बोलताना काका कोयटे यांनी 'मी भोंदू खरातचा भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही' असे म्हटले होते.

त्यासोबतच त्यांनी म्हटले होते की, समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमीनी असलेल्या खात्यांची केवायसी करूनच ते उघडण्यात आले. जास्त खाती कोविड काळात ऑनलाईन उघडण्यात आली होती. जे खातेदार म्हणतायत आमचा संबंध नाही त्याचे पुरावे पोलिसांना देऊ असं स्पष्टीकरण काका कोयटे यांनी दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >