AI Labels Mandatory : सोशल मिडीया प्लॅटफॉर्मसना एआय व्हिडीओवर लेबल अनिवार्य

आयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीर


मुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून बनवलेले व्हिडीओ किंवा इतर साहित्य सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. अशा एआय साहित्यावर लेबल लावणे सोशल मिडीया साईटसना अनिवार्य केले जाणार आहे. यासाठी आयटी-नियम 2021 मध्ये सुधारणा सूचवल्या असून निवीन मसूदा बनवण्यात आला आहे.



केंद्र सरकारने आयटी नियम 2021 मध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवत नवा मसुदा जाहीर केला असून, यावर सर्वसामान्य नागरिकांकडून अभिप्राय मागवला आहे. गेल्या 30 मार्च रोजी जाहीर केलेल्या मूळ मसुद्यात 21 एप्रिल रोजी अतिरिक्त बदलही करण्यात आले आहेत. नव्या प्रस्तावानुसार, एआयच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ, डीपफेक, तसेच व्हॉइस क्लोनिंगसारख्या कंटेंटवर स्पष्टपणे लेबल लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच, जे कोणतेही कंटेंट खरे असल्यासारखे दिसते पण प्रत्यक्षात एआयद्वारे तयार किंवा बदललेले आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक असेल.या नियमांतर्गत डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि एआयद्वारे तयार केलेले आवाज (व्हॉइस क्लोनिंग) यांचा समावेश होणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना खऱ्या आणि कृत्रिम कंटेंटमधील फरक ओळखणे सोपे होईल, असा सरकारचा उद्देश आहे.



सरकारने सर्व सोशल मीडिया मध्यस्थ (इंटरमीडियरी) प्लॅटफॉर्मसाठी या नियमांचे पालन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये बातम्या आणि चालू घडामोडींशी संबंधित कंटेंटचाही समावेश होऊ शकतो. मात्र, सामान्य वापरकर्त्यांना ‘न्यूज पब्लिशर’ म्हणून गणले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच, माहिती व प्रसारण मंत्रालयाला कंटेंटविषयी कारवाई करण्याच्या प्रक्रियेत भूमिका देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये कोणतीही तक्रार नोंदवली नसतानाही चौकशी सुरू करण्याचा अधिकार देण्याचा प्रस्ताव आहे.याशिवाय, सोशल मीडिया कंपन्यांना किमान 180 दिवसांपर्यंत डेटा सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही या मसुद्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि