Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्‍यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर विशेषत: मुरली देवरा नेत्र रूग्‍णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्‍या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.


या कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.


या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments

Jitendra Patil    April 22, 2026 03:57 PM

ठाणे येथे सुध्दा हे गरजेचे आहे. फुटपाथवरील इतरांची मक्तेदारी काढून टाकली पाहिजे.

Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र