Crime News : गोरेगावमधील नेस्कोतल्या ड्रग्जचे टिटवाळा कनेक्शन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे नेस्को मैदानात एका ट्रान्स म्युझिकल कॉन्सर्टचे (सांगितिक कार्यक्रम) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जची विक्री आणि सेवन मोठ्या प्रमाणात झाले. कार्यक्रमादरम्यान ड्रग्ज घेतलेल्यांपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला आणि एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे ड्रग्जचा वापर झाल्याची बाब उघड झाली आणि पोलीस तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी धडक कारवाई करुन या ड्रग्ज रॅकेटचे टिटवाळा कनेक्शन शोधून काढले आहे.


पोलिसांनी साकीनाका परिसरातील घरातून इरफान अन्सारी याला २०० एक्स्टेसी गोळ्यांसह (Ecstasy Pills) अटक केली. इरफानच्या चौकशीतून टिटवाळ्यातील हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या पॉल नावाच्या महिलेचे नाव पोलिसांना समजले. ही महिला दोन महिन्यांपूर्वीच कल्याण सोडून टिटवाळा येथे स्थलांतरित झाली होती. या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनात तपास पथकाने सलग तीन दिवस टिटवाळा येथील एका कॉम्प्लेक्समध्ये तिचा शोध घेतला. शनिवारी रात्री पोलिसांनी तिच्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी पॉलच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांच्या पाच हजार एक्स्टेसी गोळ्यांचा साठा जप्त केला.


पॉलला मुंबईत इरफानला अटक झाल्याचे माहिती नव्हते, त्यामुळे ती बिनधास्त वावरत होती. घरातला ड्रग्जचा साठा तिने स्थलांतरित केला नव्हता. यामुळे पोलिसांचे काम सोपे झाले. घरावर धाड टाकताच पोलिसांना डोळे विस्फारून टाकेल असा मोठा ड्रग्जचा साठा सापडला. इरफान आणि पॉल यांच्यातील दुवा असलेल्या सुफियान नावाच्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी पॉलच्या घरातून जप्त केलेल्या काही एक्स्टेसी गोळ्यांवर 'मर्सिडीज' आणि काहींवर 'डॉलर'ची चिन्हे होती. यापूर्वी नेस्को पार्टीत 'मर्सिडीज' तर वरळीत 'ऑडी' चिन्हांच्या एक्स्टेसी गोळ्या सापडल्या होत्या.


पॉल सतत नवनव्या सीमकार्डचा वापर करून ड्रगशी संबंधित व्यवहार हाताळत होती. पोलिसांनी पॉलकडून पाच मोबाईल आणि आठ सीमकार्ड जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची तज्ज्ञ तपासणी करत आहेत तसेच जप्त केलेल्या सीमशी संबंधित माहितीची तपासणी सुरू आहे. पॉल कोणाच्या संपर्कात होती आणि तिने नेमक्या कोणत्या माहितीची देवाणघेवाण केली हे तपासले जात आहे.


पॉल आधी मुंबईतच एका डान्सबारमध्ये काम करत होती. तिथून ती ड्रग्जच्या नेटवर्कमध्ये शिरली. तिची दोन लग्ने झाली असून, तिचा एक पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. पोलीस सध्या तिच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती घेत आहेत. जुन्या आणि नव्या गुन्ह्यांमध्ये काही कनेक्शन आहे का हे तपासत आहेत.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे