डर्बन : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. क्लोई ट्रायॉन आणि तुमी सेखुखुने यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पण भारतीय संघ सावरू शकला नाही. भारताने १४७ धावा केल्या, ज्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने १७.१ षटकांत २ विकेट्स गमावून केला आणि ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
चंदीगड : पंजाब किंग्स यांनी आपला विजयाचा झेंडा फडकावत ठेवत, पुन्हा एकदा पाचव्यांदा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध बाजी मारली आहे. प्रियांश आर्य (९३) आणि कूपर ...
डर्बनमध्ये भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. शेफाली वर्माने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. मात्र, इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अनुष्का शर्माने शेफालीसोबत ३१ चेंडूंमध्ये २८ धावा करून भारताला २० षटकांत १४७ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून क्लोई ट्रायॉन आणि तुमी सेखुखुने यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला चार गडी राखून पराभूत करून आयपीएल २०२६ मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. केकेआरसाठी हा हंगाम चांगला ...
१४८ धावांचे लक्ष्य गाठताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने सात चौकार आणि एका षटकारासह ३४ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. सुने लुसनेही ४६ चेंडूंमध्ये ५७ धावांची शानदार खेळी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी करून सामना जवळपास संपवला होता. त्यानंतर टॅझमिन ब्रिट्सने २० धावा केल्या आणि संघाने १७.१ षटकांत दोन गडी गमावून १४८ धावा करत सहज विजय मिळवला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.




