PM MODI : नारी शक्ती वंदन अधिनियमाचा पराभव हा महिलांचा अपमान

नवी दिल्ली : नारी शक्ती वंदन अधिनियम ही १३१ वी घटनादुरुस्ती लोकसभेत शुक्रवारी झालेल्या मतदानात पराभूत झाली. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते. पण विरोधकांनी विधेयकाला विरोध केल्यामुळे विधेयकाला दोन-तृतीयांश मते मिळाली नाही. काँग्रेस, समाजवादी पार्टी (SP), तृणमूल काँग्रेस (TMC), द्रमुक (DMK) यांच्या सह विरोधकांनी विधेयकाला विरोध केला. महिलांच्या स्वप्नाला विरोधकांनी चिरडले. पंतप्रधान म्हणून या घटनेसाठी मी देशाच्या नारी शक्तीची जाहीर माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात पंतप्रधान मोदींनी देशातील नारी शक्तीची माफी मागितली.


विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम या घटनादुरुस्तीला विरोध करून महिलांचा अपमान केला. नारी शक्ती वंदन अधिनियम ही काळाची गरज आहे. हे विधेयक मंजूर झाले असते तर देशातील सर्व राज्यांच्या शक्तीत वाढ झाली असती. पण विरोधकांनी सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांची हत्या केली. ही एक भ्रृण हत्या आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


नारी शक्ती वंदन अधिनियम लागू झाले असते तर प्रत्येक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढणार होते, महिलांचे संसदेतील प्रतिनिधित्वही वाढले असते. पण काही पक्षांनी स्वतःची घराणेशाही जपण्यासाठी विधेयकाला विरोध केला. काँग्रेस तर सुधारणाविरोधी पक्ष आहे. देशाच्या प्रगतीसाठी होणारे निर्णय हाणून पाडण्यासाठीच काँग्रेस प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला. समाजवादी पक्ष लोहियांचे विचार विसरला आहे. त्यांना स्वतःची प्रतिमा सुधारण्याची संधी होती. पण त्या पक्षाने ही संधी गमावली, असेही पंतप्रधान म्हणाले. तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकवरही त्यांनी कडाडून टीका केली.


याआधी आज (शनिवार १८ एप्रिल २०२६) पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून विशेष भाषण केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महिलांची जाहीर माफी मागितली. "आज मी माझ्या भगिनी आणि कन्यांशी बोलण्यासाठी आलो आहे. आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या स्त्रीशक्तीचा प्रवास कसा थांबवण्यात आला. त्यांची स्वप्ने निर्घृणपणे चिरडली गेली. आमचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न करूनही आम्हाला यश मिळू शकले नाही. नारी शक्ती वंदन कायदा संसदेत मंजूर होऊ शकला नाही. यासाठी मी सर्व माता आणि भगिनींची माफी मागतो"; असे मोदी म्हणाले.


२१ व्या शतकातील महिला देशातील प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना त्यांचे हेतू समजतात आणि वास्तवाचे पूर्ण भान आहे. त्यामुळे महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी जे पाप केले त्याची शिक्षा त्यांना होईल. या पक्षांनी संविधानाच्या संस्थापकांच्या भावनांचाही अपमान केला आहे.


काँग्रेस, सपा, द्रमुक, टीएमसी आणि इतर पक्षांनी इतकी वर्षे सतत कारणे देऊन महिला आरक्षणाला विरोध केला. यावेळी तांत्रिक मुद्दा उपस्थित करून त्यांनी महिलांचे हक्क हिरावून घेतले. देशाला राजकारणाची ही घाणेरडी पद्धत आणि त्यामागील कारणही समजले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नारी शक्तीला गृहित धरणाऱ्या विरोधकांनी स्त्री शक्तीचा अपमान केला आहे. सरकारने शक्य ते सर्वोत्तम प्रयत्न केले. पण नारी शक्ती वंदन कायद्यात दुरुस्ती करता आली नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले.


पंतप्रधान मोदींचे भाषण LIVE

  • लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम या घटनादुरुस्तीचा पराभव झाला. काँग्रेस, समाजवादी पार्टी (SP), तृणमूल काँग्रेस (TMC), द्रमुक (DMK) यांच्या सह विरोधकांनी विधेयकाला विरोध केला. महिलांच्या स्वप्नाला विरोधकांनी चिरडले. पंतप्रधान म्हणून या घटनेसाठी मी देशाच्या नारी शक्तीची जाहीर माफी मागतो.




  • विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम या घटनादुरुस्तीला विरोध करून महिलांचा अपमान केला

  • नारी शक्ती वंदन अधिनियम ही काळाची गरज आहे

  • नारी शक्ती वंदन अधिनियम ही देशातील सर्व राज्यांच्या शक्तीत वाढ करणार होती. पण विरोधकांनी सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांची हत्या केली. ही एक भ्रृण हत्या आहे.

  • नारी शक्ती वंदन अधिनियम लागू झाले असते तर प्रत्येक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढणार होते, महिलांचे संसदेतील प्रतिनिधित्वही वाढले असते. पण काही पक्षांनी स्वतःची घराणेशाही जपण्यासाठी विधेयकाला विरोध केला. काँग्रेस तर सुधारणाविरोधी पक्ष आहे. देशाच्या प्रगतीसाठी होणारे निर्णय हाणून पाडण्यासाठीच काँग्रेस प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी