पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार म्हणून काम करणार आहेत. एनडीएतील एक महत्त्वाचे नेत म्हणून ते दिल्लीत मोठी भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.
पाटणा : राज्यसभा खासदार आणि जेडीयूचे सर्वोच्च नेते नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पाटणा येथे लोकभवनात जाऊन ...
बिहारमध्ये एकविसाव्या शतकातही जातीपातींच्या राजकारणाला प्रचंड महत्त्व आहे. सम्राट चौधरी हे कुशवाह (कोईरी) या ओबीसींमध्ये समाविष्ट असलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची मूळं बिहारमध्ये आणखी मजबूत होतील, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे होते, त्यामुळे सम्राट चौधरींना मुख्यमंत्री करून भाजपने 'लव-कुश समीकरण' साधले आहे. बिहारच्या राजकारणात कुर्मी आणि कोईरींमधील राजकीय सामंजस्याला 'लव-कुश समीकरण' म्हणतात. हे समीकरण साधून भाजपच्या नेतृत्वात एनडीएने स्वतःची मतपेढी अर्थात व्होटबँक आणखी मजबूत केली असल्याचे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.
पाटणा : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. सुमारे दोन दशके मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या पदाचा ...
सम्राट चौधरी हे २०२३ मध्ये बिहार भाजपचे अध्यक्ष झाले. नंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्व सम्राट यांनीच केले. नितीश सरकारमध्ये ते भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. आता ते बिहारचे मुख्यमंत्री होत आहेत. सम्राट चौधरी बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. राज्यपाल सम्राट यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याचे समजते.






