Accident News : मध्यधुंद कारचालक आणि तीन जीवांचा निष्पाप बळी; कुटुंब झालं उध्वस्त

कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा धैर्यशील यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.



नेमका अपघात घडला कसा?


रविवारी संध्याकाळी हातकणंगले तालुक्यातील तळसंदे - वाठार रस्त्यावर तिहेरी अपघात झाला. बाप आणि लेकाचा जागीच मृत्यु झाला तर आई आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहे. रविवारी संध्याकाळी हे कुटुंब यात्रेला दुचाकीवरून केकले याठिकाणी जत्रेसाठी जात होते. तेव्हा काळाने झडप घातली. तळसंदे- वाठार रस्त्यावर भरधाव कारने सलग तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये चिमुकल्या धैर्यशीलच जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मुलगी गंभीर असून कोल्हापुरात उपचार सुरु आहेत.



उदय जाधव यांच्यावर कुटुंबाचा भार होता, आई वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते अंबप येथे राहत होते, शिरोली एमआयडीसीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपला एकुलता एक मुलाचं असं अपघाती निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



कारचालकाने अनेक वाहनांना उडवले


तळसंदे गावच्या वळणावर या गाडीने एक दुचाकीला धडक दिली त्यानंतर वाठारच्या दिशेने वेगाने जाताना वारणा बाजार येथील पेट्रोल पंपासमोर पुन्हा एका चारचाकी सुमोला धडक दिली शिवाय एका दुचाकीला उडवले. यात अनेक जण जखमी झाले आहे. मध्यधुंद चारचाकी चालक सदशिव चिकान्नवरमठ याला लवकरात लवकर पकडून अटक करा अशी मागणी पोलिसांकडे जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी