Monday, April 13, 2026

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

आज सकाळी ११ वाजता आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँड लोअर परेल येथील निवास्थानी ठेवण्यात आले होते. आशा ताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला. महाराष्ट्रातील नेते मंडळींसह अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू यांनी अंत्यसंस्कारात आपली उपस्थिती लावली. आशाताईंच्या घरापासून ते शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. शासकीय इतमामात शिवाजी पार्कमध्ये आशा ताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेलिब्रिटींनी शेअर केल्या पोस्ट

आशा ताईंच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी इंस्टग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शाहरुख, रितेश, सोनू निगम, अशोक सराफ इ. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केल्या.

ही अभिनेत्री झाली ट्रोल

इंस्टाग्राम स्टोरी ठेवताना आथियाने चुकून किंवा अज्ञानात लता मंगेशकर यांचा फोटो स्टोरीला टाकत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे नेटकऱ्यानी तिला धारेवर धरला, तिला तिची चूक कळेपर्यंत खूप उशीर झाला आणि तोपर्यंत तिच्या स्टोरीचे काढलेले स्क्रिनशॉर्ट्स सगळीकडे व्हायरल करण्यात आले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी लिहिलंय की 'नेपोकिड्सना कोणतीही मेहनत घेतल्याशिवाय आयती मिळालेली प्रसिद्धी याचा परिणाम आहे हा', काही लोकांनी तर तिला अडाणीच म्हटलं आहे. आपल्या भारतातल्या प्रसिद्ध गायिका या एखाद्याला माहित नसाव्यात तर हा प्रचंड लज्जापसाद प्रकार आहे. आधी माहिती करून घ्यावी आणि मगच पोस्ट करावी असा सल्ला देखील काही लोकांनी तिला दिला आहे. या सगळ्या ट्रोलिंग नंतर अभिनेत्रीने आपली स्टोरी इंस्टाग्रामवरून हटवली आहे.

Comments
Add Comment