Monday, April 13, 2026

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे मुंबईची पराभवाची हॅट्रिक झाली आहे. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. आणि मुंबई हा सामना १८ धावांनी हरले.

पण चर्चा हार्दिक आणि कृणालची

मैदानात अशी काही घटना घडली की ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि अनेक प्रश्न उभे राहिले. क्रिकेटच्या मैदानात संघ भिडतात पण इथे दोन भाऊ एकमेकांशी भिडताना दिसले. या दोन भावांतील स्पर्धा ही केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नव्हती तर त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या नात्यातील तणाव हा स्पष्टपणे दिसून येत होता. कृणाल पंड्या आणि हार्दिक यांच्यात काहीतरी बिनसलं आहे अशी चर्चा अनेक दिवसांपासून चालू होती, पण मैदानावरची ती घटना पाहून त्या अफवांना आता चांगलीच हवा मिळाली आहे.

मैदानात नक्की घडलं काय?

बॉलिंग करताना कृणालने हार्दिकला बाउन्सर टाकत त्याचे स्वागत केले. त्यावर हार्दिक थंड नजरेने प्रतिसाद दिल्याचे सर्वांच्या नजरेस पडले. जेव्हा आरसीबीच्या जेकब डॅफीने हार्दिकची विकेत घेतली तेव्हा कृणाल पंड्या याने मोठ्याने आणि अतिशय आक्रमकपणे जल्लोष केला, त्यामुळे चाहते हैराण झाले. हे प्रकरण इतक्यातच न थांबता मॅच संपल्यावर जेव्हा सगळे खेळाडू एकमेकांना हात मिळवतात करतात, तेव्हा या दोन भावांनी एकमेकांना हात देखील मिळवले नाहीत. त्यामुळे यांच्यात काहीतरी बिघडल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे, हे दोघे भाऊ भले वेगळ्या संघासाठी खेळत असले तरी मैदानात नेहमीच मज्जा मस्करी करताना आपल्याला दिसतात पण यावेळी त्यांच्यात जे झालं, त्यावरून खरंच त्यांच्यात बिनसलंय की फळत मॅच पुरता हा आक्रमकपणा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

Comments
Add Comment