Asha Bhosle : एक होती आशा...

'मेलडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका आणि विख्यात मंगेशकर कुटुंबातील कनिष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने चित्रपट संगीताचा श्वास थांबला.


मंगेशकर भगिनींचा जन्म सांगलीचा. दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील. त्यांच्या पश्चात लतादीदींनी संगीत क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर आशा ताईंचे हिंदी चित्रपट संगीतसृष्टीत आगमन झालं. लता दीदी म्हणजे हिंदी चित्रपट संगीतसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न होतं तर आशाताई म्हणजे त्याच चित्रपट संगीतसृष्टीला पडलेलं रूपेरी स्वप्न. आशाताईंनी १२ हजार गाणी गायिली. जवळजवळ प्रत्येक गीत हिट या गणतीत जाणारे होते. लता दीदी असोत की आशाताई या दोघींनी जीवनाची प्रदीर्घ वर्षे चित्रपट संगीतसृष्टीत सर्वोच्च स्थान पटकावले. आशा ताईंचा आवाज चिरकाल टिकणारा होता. लता दीदींनी उडत्या चालीची गाणी फार गायिली नाहीत. पण आशाताई उडत्या चालीच्य गाण्यांसाठी, कॅबरे आणि नृत्यगीतांसाठीच प्रसिद्ध होत्या. त्यांनी गीतातील शब्दांशी कधी तडजोड केली नाही. जेव्हा शब्द त्यांना खटकत तेव्हा त्यांनी ते गीतकाराकडून बदलून घेतले. याबाबतीत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी आशाताईंसाठी लिहीलेले 'पिया तू अब तो आजा' हे गाणे उदाहरणादाखल द्यावं लागेल. यातील शब्द आशाताईंना खटकले तेव्हा मजरूहजींना सांगून त्यांनी ते बदलून घेतलं. तरीही ते गाणे आज आशाताईंच्या गाण्यातील सर्वात गाजलेले गाणे म्हणून गणले जाते. या गीताला त्यावेळी आकाशवाणीवर काही दिवस बंदी होती.


आशा ताईंनी दोन विवाह केले. गणपतराव भोसले हे त्यांचे पहिले पती, तर संगीतकार आर.डी.बर्मन हे दुसरे. त्यापैकी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केल्यावर काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. पण संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी त्यांचे संगीत आणि जीवनाचे घट्ट सूर जुळले होते. बर्मन आणि आशाताईंनी अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आणि त्यापैकी अनेक गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहे. त्यांचं चकाकणारं स्टारडम सगळ्यांनी पाहिलं. मात्र त्यांच्या वेदना कुणालाच दिसल्या नाही. त्यांचं आयुष्य केवळ प्रसिद्धी आणि सुरांनीच सजलेलं नव्हतं, तर त्यामागे वेदना आणि संघर्षाचा एक मोठा काळ होता. आशा भोसले यांनी त्यांच्या जीवनावर आधारित बायोग्राफीमध्ये पहिल्या लग्नात झालेला छळ आणि त्यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांना एकूण तीन मुलं होती. यात एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश होता. दुर्दैवाने, नियतीने त्यांच्यावर अनेक आघात केले. त्यांची मुलगी वर्षा, जी पत्रकार होती, तिने आत्महत्या केली. तर मुलगा हेमंत भोसले यांचे कॅन्सरसारख्या आजाराने निधन झाले. इतकं दुःख पचवून आशाताई पुन्हा उभ्या राहिल्या. आशा भोसले यांचा संगीतकार ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन यांच्याशी असलेला सांगीतिक प्रवास भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णपान आहे. नय्यर साहेबांनी आशाताईंच्या आवाजातील वेगळेपण ओळखून अनेक सुपरहिट गाणी दिली. त्यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गायली असून, सर्वाधिक गाण्यांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.आशा भोसले यांनी 'उमराव जान' सारख्या चित्रपटातील भावपूर्ण गझलांना आवाज देण्यासोबतच, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक आयकॉनिक कॅबरे आणि डान्स नंबर्स (उदा. 'दम मारो दम', 'पिंजरावाली आया') गायली. त्यांच्या आवाजातील अष्टपैलुत्वामुळे हे कॅबरे गाणे त्यांच्या ओळखीचा एक मोठा भाग बनले, ज्यामुळे त्यांना 'कॅबरे क्वीन' म्हणूनही ओळखले जाऊ लागले.


आशा ताई यांचे घर संगीताच्या वातावरणाने ओतप्रोत भरलेले होते. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे एक अत्यंत प्रसिद्ध मराठी नाट्यसंगीतकार, शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळालेल्या शास्त्रीय संगीताच्या प्रेरणेने त्यांनी आपले गायन कौशल्य विकसित केले. त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ गायन केले. हिंदी आणि मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले."पिंजरा," "दम मारो दम," "ये मेरा दिल" आणि इतर अनेक प्रसिद्ध गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी वडिलांचे शास्त्रीय संगीत गाण्याचा वारसा पुढे चालू ठेवला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील संबंधांबद्दल अनेक वर्षे चर्चा आणि तर्कवितर्क लढवले गेले. मनोरंजन विश्वात अशा चर्चा होत्या की दोन दिग्गज गायिका एकाच घरात असल्याने त्यांच्यात व्यावसायिक असूया असू शकते. लता मंगेशकर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्यात कोणतीही कटुता नाही आणि आशा भोसले या त्यांच्या धाकट्या बहिण आहेत. त्यांचे आपापसात उत्तम संबंध आहेत. त्यानंतर कुणीही ती चर्चा करण्याची हिमत केली नाही. आशाताई लतादीदींना गुरूस्थानी मानत.


आशाताई आणि लता दीदी या भारतीय चित्रपट सृष्टीतील दोन सर्वात दिग्गज गायिका. हे नाते केवळ व्यावसायिक स्पर्धा नव्हते, तर ते बहिणींमधील एक भावनिक नाते होते. चित्रपट सृष्टीतील काही लोकांनी त्यांच्यात गैरसमज पसरवून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे आशा ताईंनी एका मुलाखतीत कबूल केले होते. लोक अनेकदा चुकीच्या गोष्टी सांगून तणाव निर्माण करत, पण "रक्त हे पाण्यापेक्षा जास्त गडद असते" असे सांगून आशा ताई यांनी या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.अनेक दशकांचा प्रवास, व्यावसायिक स्पर्धा आणि वैयक्तिक आयुष्यातील वादळानंतरही, त्यांचे नाते अखेरपर्यंत टिकून राहिले. आशा ताईंनी गायलेल्या गाण्यांमधील चालींमध्ये एक प्रकारची नजाकत होती. या चालींना आशाताईंच्या सोनेरी आवाजाचा परिस स्पर्श होता. आशा ताई यांनी संगीताच्या क्षेत्रात अष्टपैलुत्व गाजवले आहे. गझलांपासून ते पॉप संगीतापर्यंत आणि भावपूर्ण गीतांपासून ते भजनापर्यंत अनेक प्रकार हाताळले. २०११ मध्ये दिग्गज गायिका आशा भोसले यांची 'सर्वाधिक रेकॉर्डेड गायिका' म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद करण्यात आली.११,००० हून अधिक एकल, युगल आणि कोरस गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांना हा बहुमान लंडनमध्ये देण्यात आला होता. आशा ताईंची नोदं "क्वीन ऑफ इंडी पॉप" आणि "टाईमलेस आवाजाच्या मलिका" अशी केली जाईल. आशाताईंना विनम्र अभिवादन!

Comments
Add Comment

देवाघरच्या फुलांची तस्करी...

मुलांच्या संगोपनाची पालक म्हणून आई-वडील जेवढी काळजी घेतात, तसेच उत्तरदायित्व त्या राज्याकडे येते. त्यामुळे बाल

युद्ध विरामालाच विराम?

शस्त्रबंदीमुळे तेल आयातीवर अवलंबून असणारी भारतासारखी अनेक राष्ट्रे सुखावली. श्रेय कोणीही घ्या, पण युद्ध एकदाचे

मराठी शाळा व संस्कृती वाचवणार कोण?

मराठी शाळा टिकण्यासाठी आता हवी फक्त पालकांची इच्छाशक्ती व मानसिकतेत होणारा बदल आता मराठी शाळा टिकवू शकतात असं

अर्थ बजेटचा, संकल्प सरकारचा

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. विकसित देशाच्या दृष्टीने त्यात

मतदानापूर्वीच राज्यात भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा षट्कार!

कल्याणमध्ये तीन, धुळ्यात दोन, तर पनवेलमध्ये एक विजयी मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची विदर्भातही धावपळ...

अविनाश पाठक दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या